Site icon सक्रिय न्यूज

मुख्यमंत्री असताना दुर्लक्ष केलं नसतं तर तेंव्हाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं……..!

मुख्यमंत्री असताना दुर्लक्ष केलं नसतं तर तेंव्हाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं……..!

मुंबई – दि.२ – मुख्यमंत्री असताना शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले असते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप शशिकांत पवार यांनी केला आहे. शशिकांत पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.

             शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाच्यावेळी त्यांच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं. पण पवारांनी तेव्हा दुर्लक्ष केलं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही, असंही शशिकांत पवार म्हणाले.

पवार मुख्यमंत्री असताना त्यांना मी भेटलो होतो. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली होती. पण त्यांनी काही अडचणी आहेत असं सांगून ते टाळलं. तेव्हापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न जैसे थे राहिला. पवारांनी मनावर घेतलं असतं तर तेव्हाच हा प्रश्न सुटला असता, असं शशिकांत पवार यांनी सांगितलं.

शेअर करा
Exit mobile version