Site icon सक्रिय न्यूज

जगातील सर्वात हुशार शिक्षक सोलापूरचा………आयएएस तुकाराम मुंढेंचा मानाचा मुजरा……!

मुंबई दि.४ – युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार  शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना मिळाला आहे. डिसलेंचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे. अशातच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनाही डिसले याचं कौतुक केलं आहे.

‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा, असं तुकाराम मुंंढे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. यासोबतच त्यांनी डिसले यांचा फोटो शेअर केला आहे.

7 कोटीचा ग्लोबल टीचर पुरस्कार ZP गुरुजी रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. सोलापुर जिल्हा परिषदेतील शिक्षक डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वोत्तम शिक्षक ठरले आहेत, असंही मुढेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सात कोटींचा हा पुरस्कार असून हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरलेत. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्राचे एसीपी श्रीकांत डीसले यांचे रंजितसिंह हे बंधू आहेत.

शेअर करा
Exit mobile version