Site icon सक्रिय न्यूज

कोरोना प्रतिबंधावर शास्त्रज्ञांचा नवा निष्कर्ष…….? कोणते तीन घटक रोखू शकतात कोरोनाचे संक्रमण…….?

कोरोना प्रतिबंधावर शास्त्रज्ञांचा नवा निष्कर्ष…….? कोणते तीन घटक रोखू शकतात कोरोनाचे संक्रमण…….?
मुंबई दि.४ – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. यामुळे कोरोना होऊ नये म्हणून सगळेच जण काळजी घेत आहेत तसेच रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल याकडे लक्ष देत आहेत.
         कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन करावं, असा निष्कर्ष समोर आला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन बळ देऊ शकते, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे.

ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षामधील केमिकल कोरोना एंझायम ब्लॉक करते ज्याच्यापासून कोरोना पसरतो. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार प्रोटीज इंझायमच्या मदतीने कोरोना पसरतो. जर हेच द्रव्य आपण शरीरात पसरणं थांबवलं तर कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आम्ही औषधी वनस्पतींवर संशोधन करीत आहोत, ज्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते, असं अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ज्ञ डी. यू. शी यांनी सांगितलं आहे.

शेअर करा
Exit mobile version