Site icon सक्रिय न्यूज

शाखा डाकपालाचा खातेदारांच्या रक्कमेवर डल्ला……! केज तालुक्यातील प्रकार……!  

केज दि.5 – शाखा डाकपालाने आरडीच्या ५८ खातेदारांनी भरणा केलेली ६५ हजार १५० रुपयांची रक्कम सरकारकडे जमा न करता या शासकीय रक्कमेेेचा वापर केला. या रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे उघडकीस आला आहे. त्यावरून शाखा डाकपाल दत्तात्रय कविदास काळे यांच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 
         केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील पोस्ट कार्यालयात शाखा डाकपाल या पदावर याच गावातील दत्तात्रय कविदास काळे हे कार्यरत होते. गावातील आरडीच्या ५८ खातेदारांनी शाखा डाकपाल काळे यांच्याकडे ऑक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१८ या कालावधीत रक्कमेचा भरणा केला. त्यांनी या आरडीच्या ५८ खातेदारांना त्यांनी स्वीकारलेल्या रक्कमेची त्यांच्या पासबुकमध्ये नोंद ही करून दिली. आरडीच्या खातेदारांनी भरणा केलेली रक्कम ही नियमितपणे सरकारकडे जमा करणे आवश्यक असते. मात्र डाकपाल दत्तात्रय काळे यांनी या आरडीच्या ५८ खातेदारांनी भरलेली ६५ हजार १५० रुपयांची रक्कम सरकारकडे जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून  शासकीय रक्कमेचा अपहार करीत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून अंबाजोगाईचे उपविभागीय डाक निरीक्षक सचिन मल्लिकार्जुन स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनेसांगवीचे शाखा डाकपाल दत्तात्रय कविदास काळे याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सीमाली कोळी ह्या पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version