मुंबई दि.६ – मराठी चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. असून महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. ते 83 वर्षाचे होते.
रवी पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश तसेच खलनायकी भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे रवी पटवर्धन अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.