Site icon सक्रिय न्यूज

ऑनलाइन आर्थिक व्यवहारात आरबीआय चा मोठा निर्णय…….!

ऑनलाइन आर्थिक व्यवहारात आरबीआय चा मोठा निर्णय…….!

नवी दिल्ली दि.६ – बँकेेेत जाऊन लाईन मध्ये उभे राहण्यापेक्षा, जास्तीचे पैसे घेऊन फिरण्यापेक्षा सध्या ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र अशात आरबीआयने एक मोठा निर्णय घेतला असून येत्या 14 तारखेपासून मोठा बदल करण्यात आला आहे.

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटही (RTGS) सुविधा डिसेंबर महिन्यात लागू करण्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. 14 डिसेंबरपासून ही सुविधा लागू होणार आहे. डीजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.आरटीजीएस प्रणाली वर्षाचे सर्व दिवस 24 तास उपलब्ध केली जाणार आहे. याची सुरुवात 14 डिसेंबर 2020 च्या 00:30 वाजल्यापासून होणार आहे. याआधी या प्रणालीत सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. फक्त महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारी हे उपलब्ध नाही.

दरम्यान, आरटीजीएस हे मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी याचा वापर केला जातो. यामध्ये दोन लाख रुपयांपेक्षा कमी पैसे पाठवत येत नाही. आपण ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. मात्र ब्रांचमध्ये RTGS मधून फंड ट्रान्सफर केल्यानंतर शुल्क द्यावं लागतं.

शेअर करा
Exit mobile version