केज दि.६ – तालुक्यातील शिरपुरा येथील नवोदित लेखक कमलाकर दैवान सोनवणे यांनी लिहिलेल्या बीड जिल्ह्याची ओळख या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी दुपारी ४ वाजता सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या हस्ते पत्रकार भवनात पार पडले.
बी.एस्सी.ऍग्री करून डी.एड. व बी.ए. ची पदवी प्राप्त केलेल्या तरुणाने पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी प्रश्नमंजुषा या नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पुन्हा त्यांनी बीड जिल्ह्यातील सामाजिक, ऐतिहासिक व भौगोलिक माहिती एकत्र करून बीड जिल्ह्याची ओळख या नावाने पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकातील माहिती सर्वच विद्यार्थ्यांना व विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासात उपयुक्त ठरणारी माहीती आहे. दरम्यान जिल्ह्यातील माहिती मिळवण्यासाठी व आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी कमलाकर सोनवणे यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार डी.डी. बनसोडे, दिपक नाईकवाडे, इकबाल शेख, संतोष गालफाडे, मजहर शेख, महादेव गायकवाड, विनोद ढोबळे आदींची उपस्थिती होती.