नवी दिल्ली दि.९ – युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रिपदावर असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. सध्या सोशल माध्यमांवर हे पत्र व्हायरल झालं आहे. या पार्श्वभमूीवर शरद पवारांना दिल्लीत पत्रकारांनी यावर प्रश्न विचारत पवारांकडून त्याचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं. यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नसल्याचं पवार म्हणाले. पवारांनी असं सांगत अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
पवारांनी पत्रामधील खुलासा केल्यानंतर पत्रकांरांनी शेतीच्या विषयावर पवारांना प्रश्न विचारले. यावर पवार म्हणाले, उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला वेगवेगळ्या पक्षातील लोक एकत्र येऊन यावर एकमताने निर्णय घेतील त्यामुळे यावर आत्ता भूमिका मांडणं योग्य नाही. मात्र तराही पत्रकारांनी पुन्हा शेतीवर प्रश्व विचारला तेव्हा पवार संतापले आणि बोलले की, शेतीच्या मुद्यावर आत्ता बोलणार नाही. चर्चा झाल्याशिवाय माझी भूमिकाही मी मांडणार नाही.
दरम्यान, हे सर्व झाल्यानंतर पत्रकारांनी 2010 सालच्या पत्रासंबंधी पुन्हा प्रश्व विचारला तेव्हा मात्र पवार संतापाले, तुम्ही माझा वेळ घालवत आहात. त्यामुळे वारंवार तोच प्रश्न करू नका. तुम्ही बाहेर उभे होतात म्हणून मी तुम्हाला आत बोलावल ही माझी चुक झाली यापुढे परत असं करणार नाही, असं म्हणत पवार पत्रकार परिषद सोडून निघून गेले.