एलियन्स नेमके अस्तित्वात आहेत की नाही याबाबत अजून प्रश्न आहेतच. पण आता याचसंदर्भात इस्त्राईलच्या एका संशोधकाने मोठा आणि खळबळजनक दावा केलाय.या संशोधकाच्या दाव्यानुसार, एलियन्स हे पृथ्वीवर लपले आहेत. शिवाय ब्रम्हांडातील एलियन्स हे अमेरिका आणि इस्त्राईलसोबत संपर्कही आहेत.
इस्त्राईलच्या माजी अंतराळ सुरक्षा मोहिमेचे प्रमुख हैम इशेद यांनी हा दावा केलाय. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यासंदर्भात घोषणा करणार होते, परंतु त्यांना एलियन्सनेच रोखलं. शिवाय एक गॅलेक्टीक फेडरेशन बनवलं असून अमेरिकेसोबत गुप्त करार केलाय. यानुसार मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनवण्यात आला, असल्याचं इशेद यांचं म्हणणं आहे.
दरम्यान इशेद हे इस्त्राईलच्या संस्थेत 30 वर्षे कामाला होते. ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना ‘इस्त्राईलच्या सॅटेलाइट कार्यक्रमाचा जनक’ म्हटलं होतं.