बीड दि.9 – जामीन मांडण्यासाठी तक्रार दाराकडून 9 हजारांची लाच घेताना केज तालुक्यातील युसुफ वडगाव ठाण्यातील पोलीस हवालदार लक्ष्मीकांत पवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
जामीन मांडण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रार दार यांच्याकडे 18 हजारांची मागणी केली होती. दरम्यान 9 हजारावर तडजोड झाल्यानंतर पोलीस ठाणे परिसरात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरील कारवाई डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, श्रीमती अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद, बाळकृष्ण हनपुडे-पाटील, पोलीस उप अधीक्षक ला.प्र. वि.बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राजकुमार पाडवी, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. बीड, पो.कॉ. मनोज गदळे, पो.कॉ. वीर, चालक पो. ना. म्हेत्रे ला.प्र.वि. बीड यांनी पार पाडली.