बीड दि.९ गावामधील तलाव, नदीपात्र, नाले इत्यादीचे खोलीकरण करण्याचे काम करण्याची ज्या गावक-यांची तयारी आहे अशा गावात जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक सेवाभावी
संस्था तयार आहेत. सदर सेवाभावी संस्थेतर्फे जेसीबी मशीन व ऑपरेटर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये संबंधित गावकऱ्यांनी सदर जेसीबीसाठी लागणाऱ्या इंधनाची सोय करायची तयारी आहे, अशा गावांना या पद्धतीने आपल्या गावांमध्ये तलाव खोलीकरण, नदी, नाल्यांचे खोलीकरण, कॅनालमधील गाळ काढणे अशा पध्दतीचे कामे करावयाची आहेत अशा कामांसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या लेटरहेडवर याबाबतचे (काय काम करावयाचे आहे त्याकामाचे) पत्र तयार करून ते पत्र रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे द्यावे. ज्यांचे पत्र प्रथम प्राप्त होतील त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) बीड यांनी कळविले आहे.