Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन प्रेमवीराचा थरार, दोन जीव घेऊन स्वतः रेल्वेखाली केली आत्महत्या……!

बीड दि.११ – नागपूर शहरात अतिशय थरारक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलाने 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे तर अवघ्या 10 वर्षांच्या यश धुर्वेची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.

हत्या केल्यानंतर आरोपी फरार होता. मात्र पोलिसांनी शोध घेतला असता त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील एका तरूण मुलीच्या सतत मागावर होता. त्यानंतर एक दिवस आरोपीने तरुणीचं घर गाठून आजी आणि भावाची हत्या केली.

शेअर करा
Exit mobile version