Site icon सक्रिय न्यूज

का पुकारला आहे आज राज्यातील 45 हजार डॉक्टरांनी संप…..? केज शहरातील डॉक्टर्सही सहभागी……!

का पुकारला आहे आज राज्यातील 45 हजार डॉक्टरांनी संप…..? केज शहरातील डॉक्टर्सही सहभागी……!
बीड दि.११ – देशभरातील डॉक्टरांनी आज बंद पुकारलाय. आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास दिलेली परवानगी मागे घेण्याच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ पदव्युत्तरांना डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आयुर्वेद हे फक्त कफ, वात, पित्त अशा भिन्न विचाराच्या संकल्पनांवर आधारित असून याची तुलना आधुनिक वैद्यकशास्त्राशी करता येणार नाही अशी भूमिका आयएमएने मांडली आहे.

                याबाबत महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र आयएमचे सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, आयुर्वेदाच्या डॉक्टरांना परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये राज्यातील जवळपास 45 हजार डॉक्टरांचा समावेश आहे. शिवाय इतर वैद्यकीय संघटनांचा देखील या बंदला पाठिंबा आहे.”

राज्यभरातील सर्व खासगी दवाखाने तसंच रुग्णालयातील ओपीडी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद ठेवली आहेत. आपात्कालीन सेवा मात्र सुरू राहणार असल्याचं आयएमएकडून सांगण्यात आले आहे.

    दरम्यान केज शहरातही आपत्कालीन तसेच कोव्हीड 19 सेवा वगळता सर्व ऍलोपॅथी डॉक्टर्स संपात सहभागी झाले असून सायंकाळी 6 पर्यंत सहभागी राहणार असल्याची माहिती केज तालुका A I M चे अध्यक्ष डॉ.टी. व्ही.चाटे यांनी दिली.
शेअर करा
Exit mobile version