Site icon सक्रिय न्यूज

विवाहितेवर सामूहिक अत्याचार……..!

बीड दि.१२ – कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पन्हाळा तालुक्यातील साखरवाडी येथे एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.  पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.                           दरम्यान अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत असून सदरील विवाहित महिला दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली असता तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. संशयित आरोपींनी तिचे हात खाटेला बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

कोडोली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेअर करा
Exit mobile version