केज दि.१४ – तालुक्यातील शिरूर घाट आणि चंदन सावरगाव येथे एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. दोन्हीही घटना नेमक्या कोणत्या करणातून झाल्या हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शिरूरघाट ता. केज येथील गोदावरी रमेश सांगळे वय (३५ वर्ष) या विवाहित महिलेने दि.१३ रोजी पहाटे ४.३० ते ५ च्या सुमारास घरा समोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
तर दुसऱ्या घटनेत चंदन सावरगाव येथे सलून व्यावसायिक प्रमोद संभाजी राऊत वय (२९ वर्ष) या विवाहित युवकाने दुपारी २.३० च्या सुमारास त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळे जवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला एक सहा महिने वयाचा मुलगा आहे.
आकस्मिक मृत्यूची केज आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दोन्ही घटनेतील मयताचे केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान सदरील घटना नेमक्या कोणत्या करणातून झाल्या हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस घटनेची माहिती घेत आहेत.