बीड दि.15 – आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.14 रोजी कारखेल बुद्रुक शिवारात एका इसमाने शेतामध्ये घराचे बाजुला गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले आहे.
सदरील माहिती पोलिसांना मिळल्यावरून सपोनि डी.बी.कुकलारे यांनी पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आष्टी यांना कळवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीचे ठिकाणी शासकीय पंच, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पोलीस कर्मचाऱ्यांसह कारखेल शिवारातील सर्वे नं. 86 मध्ये जावून छापा टाकला. यावेळी सचिन साहेबराव जाधव, रा.कारखेल बुद्रुक, ता.आष्टी याने त्याचे घराचे बाजुला विना परवाना बेकायदेशिररित्या गांजाची झाडे लावून त्याचे संवर्धन व जोपासना करताना दिसून आला. सदरील ठिकाणाहुन एकूण 16 किलो 830 ग्रॅम वजनाची 1,68,300/- रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळून आली. सदर मुद्देमाल शासकीय पंचासमक्ष जप्त करून आरोपीस ताब्यात घेवून सपोनि कुकलारे यांचे फिर्यादीवरून आरोपी सचिन साहेबराव जाधव, रा.कारखेल बुद्रक, ता.आष्टी याचेविरुध्द अंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंभोरा पोलीस हे करत आहे.
सदरिल कारवाई सपोनि डी.बी.कुकलारे, पोउपनि आर.पी.लोखंडे, पो.ना. पी.व्ही. देवडे, पो.ना. के.बी.राठोड, पो.शिपाई ए.सी. बोडखे, चालक पो.शिपाई शौकत शेख यांनी केली.
(प्रतिकात्मक फोटो)