Site icon सक्रिय न्यूज

घरगूती गॅस पुन्हा महागला……..!

घरगूती गॅस पुन्हा महागला……..!
बीड दि.१६ –  घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी आज एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली.घरगुती गॅसच्या 14.2 किलो वजनाच्या टाकीच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 5 किलोची छोटी टाकी आता 18 रुपयांनी महागली आहे. तर 19 किलोच्या मोठ्या टाकीच्या किमतीत 36.50 रुपयांनी झाली आहे.

इंडियन ऑईलच्या माहितीप्रमाणे, दिल्लीत 14.2 किलो वजनाची विनाअनुदानित गॅसची टाकी 644 रुपयांना मिळणार असून दिल्लीच्या दराप्रमाणे मुंबईतही गॅस मिळणार आहे.

गॅसच्या किमतीत वाढ झाली असली तरी दुसरीकडे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही. गेल्या 8 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version