केज दि. १७ – शहरातील बसस्थानाकाच्या बाजूला असलेल्या मेघराज हॉटेल चे मालक मेघराज प्रल्हादराव रांजणकर यांचे (दि.१६) रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४९ वर्ष होते.
मेघराज रांजणकर हे रात्री हॉटेलवर असताना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाईला पाठवण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.