Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्हयात “ऑपरेशन मुस्कान 09 ” महाराष्ट्र या विशेष शोध मोहिम दरम्यान “9” बालकांचा शोध

बीड दि.१८ – मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मा. पोलीस महासंचालक म.रा.मुंबई यांचेकडून “ऑपरेशन मुस्कान ०९” ही विशेष मोहीम दिनांक ०१/१२/२०२० ते दिनांक ३१/१२/२०२० या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, बीड यांनी रेकॉर्डवरील दोन गुन्हयातील अपहरित बालकाचा शोध घेतला आहे.
       पोलीस स्टेशन चकलंबा गु.र.नं. 47/2019 कलम 363 भादवि व पोलीस स्टेशन सोयगाव जि.औरंगाबाद ग्रामीण गु.र.नं. 07/2019 कलम 363 भादवि मधील पिडीत मुलीचा शोध घेवुन कायदेशिर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच रेकॉर्ड व्यतीरिक्त या मोहिमे दरम्यान महिला सुरक्षा शक्ती पथकाने 4, पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण- 2 व पोलीस स्टेशन गेवराई येथील पथकाने 1 बालकाचा शोध घेवुन त्यांना त्यांचे कायदेशिर पालकांच्या ताब्यात दिले. या विशेष शोध मोहिमे दरम्यान 4 मुले व 5 मुली असे एकुण 9 बालकाचा शोध घेण्यात आला आहे.
       दरम्यान बीड जिल्हयातील जनतेस आवाहन करण्यात येते की, आपणास आई- वडीलांपासून वंचित असलेले, हरवलेले १८ वर्षाखालील मुले-मुली आढळून आल्यास तसेच रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भिक मागणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्नालये, हॉटेल्स, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अशा मुलांना हरवलेली मुले समजुन त्यांची चौकशी करुन त्यांचे कायदेशिर पालकाच्या तब्यात देण्यात येणार आहे. तरी जनतेने यासाठी सहकार्य करावे. असे बालके आढळल्यास पोउपनि एस.एस.भारती यांचे पुढील मोबाईल नंबर वर संपर्क करावा. मो.नं. ९५५२५०७०३१, पोहेको/७८९ पी.वाय.वाळके ९८२२०७९७८९. व जे मुले-मुली आपल्या आई- वडीलांपासून दूर गेलेले आहेत हरवलेले आहेत. त्यांना त्यांच्या आई-वडील यांचेशी भेट होवून त्यांना पुढील जीवन जगण्यास मदत होईल यासाठी “ऑपरेशन मुस्कान-९ ” विशेष शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
शेअर करा
Exit mobile version