Site icon सक्रिय न्यूज

केज तालुका संजय गांधी निराधार समितीवर प्रणिता संतोष सोनवणे यांची वर्णी…….!

केज दि. १८ – मागच्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या सदरील समिती कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून केज तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या पत्नी प्रणिता सोनवणे यांची महिला प्रवर्गातून अशासकीय सदस्यपदी निवड झाली आहे. 
         दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दि.१७ रोजी घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणीत समितीचे अध्यक्ष म्हणून बालासाहेब पंढरी बोराडे यांची निवड केली आहे. तर  कपिल अंबादासराव मस्के, प्रणिता सतोष सोनवणे, सतिश विठ्ठल गोरे, वचिष्ट लक्ष्मणराव सांगळे, मधुकर रामकृष्ण तपसे, लक्ष्मण प्रभाकर काळे, श्रीकांत नारायण घुले, रत्नाकर अच्युतराव शिंदे, नारायण प्रल्हादराव शिंदे इत्यादींची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
             प्रणिता सोनवणे व कपिल मस्के यांच्या निवडीबद्दल माजी खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, नगराध्यक्ष आदित्य पाटील, राहुल सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
——————————————-
वंचितांचे प्रश्न मार्गी लावणार…….!
          खा. रजनीताई पाटील यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला शासकीय तालुका कमिटीवर नियुक्ती देऊन महिलांसाठी त्यांच्या मनात असलेला सन्मान या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. आमच्या नेत्या रजनीताई पाटील, पालकमंत्री धनंजय मुंडे, आदित्य दादा पाटील, राहुल भैय्या  सोनवणे, संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी यापुढेही सामाजिक कार्यात अग्रेसर राहून या कमिटीच्या माध्यमातून निराधार व वंचितांचे प्रश्न मार्गी लावेल. सर्वांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारी बद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. 
          सौ. प्रणिता संतोष सोनवणे

——————————————-
शेअर करा
Exit mobile version