Site icon सक्रिय न्यूज

उद्यापासून महाराष्ट्रातील ”या” क्षेत्रात रात्रीची संचार बंदी…..!

उद्यापासून महाराष्ट्रातील ”या” क्षेत्रात रात्रीची संचार बंदी…..!
मुंबई दि.२१ –  ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. यासाठी खबरदारी म्हणून राज्यात संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या विषाणुची घातकता काही दिवसात समजेल मात्र तोपर्यंत खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी असणार आहे. 22 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. युरोपातून आणि मध्य पूर्वतून येणा-या प्रवाशांना 14 दिवस सक्तीचे संस्थात्मक क्वांटाईन बंधनकारक करण्यात आलं आहे.तसेच या प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर पाचव्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी झाला की त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, यंदाच्या 31 डिसेंबरला आपल्या घरीच रहाव लागणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी रात्रीच्यावेळी घरातच बसावं अन्यथा पोलीस कारवाई होऊ शकते.

शेअर करा
Exit mobile version