Site icon सक्रिय न्यूज

कोरोनाचे नवे रूप अधिक संसर्गजन्य, काळजी घेण्याची गरज – राजेश टोपे

मुंबई दि.२४ – यूके मध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचे नवे रूप हर अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपल्यालाही आता जास्त काळजी घ्यावी लागेल, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोना विषाणूचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य असला तरी आपण सध्या देत असलेली औषधं आणि निर्माण होत असलेल्या कोरोना लस या त्या विषाणूवर परिणामकारक असल्याचा दावा राजेश टोपे यांनी केलाय.कोरोनाबाबत सरकारने घालून दिलेले नियम पाळणं अधिक गजरेचं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि नाताळ, तसंच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लावलेल्या रात्रीच्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद असल्याचं टोपे म्हणाले.

मकडून लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मागण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत बायोटेककडूनही केंद्र सरकारकडे परवानगी मागवली आहे. त्यामुळे आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. त्यांनी ठरवायचं आहे की कोणत्या तारखेला लसीकरणाला सुरुवात करायची, असं राजेश टोपेंनी सांगितले.

शेअर करा
Exit mobile version