Site icon सक्रिय न्यूज

रासप चे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मालमत्तेवर ईडीचे छापे……!

बीड दि.२४ – गंगाखेड मतदार संघाचे रासपचे आमदार तथा उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांच्या परभणी, धुळे आणि बीड जिल्ह्यातील कार्यालय तसेच विविध ठिकाणी बुधवारी धाडसत्र राबवले. यामध्ये सुमारे 255 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचा अंदाज आहे.

          गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड येथे तर बीड आणि धुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. आ. गुट्टे हे मोठे उद्योगपती असून मागच्या कांही दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे चांगलेच चर्चेत आले होते.
शेअर करा
Exit mobile version