मुंबई दि.२४ – सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ला ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त इंग्लंड दौऱ्यावर असताना लॉकडाऊनचा फटका बसला आहे.ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रिंकूला लंडनमध्येच थांबून राहावं लागत आहे. रिंकूसोबत ‘छूमंतर’ सिनेमाची टीमही इंग्लंडमध्येच आहे.
समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ सिनेमाचे चित्रिकरण इंग्लंडमध्ये सुरु आहे. यामध्ये रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, ‘नाळ’ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे शूटिंग करत आहेत.
दरम्यान लॉकडाऊनमुळे अनेक मोठे अभिनेते-अभिनेत्री इंग्लंडमध्ये अडकले आहेत. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या इंग्लंडमध्ये आहे. याशिवाय अभिनेता संतोष जुवेकरही लॉकडाऊनमुळे लंडनमध्येच अडकला आहे.