Site icon सक्रिय न्यूज

वैद्यनाथ कारखान्यातील चोरी प्रकरणी नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल……!

बीड दि.२४ – परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरटयांनी लंपास केले होते. ज्याची किंमत सुमारे 37 लाख 94 हजार 914 इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादवि 461, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख रा. लातूर यांना अटक केली.
        तसेच या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख रा. परळी याच्याविरूध्दही गुन्हा दाखल केला आहे. मंगलदादा नगरसेविकेचा पती आहे.
शेअर करा
Exit mobile version