Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात वाघेबाभूळगाव येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या……!

केज दि. २५ – तालुक्यातील वाघे बाभूळगाव येथे एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना (दि.२५) रोजी सकाळी उघडकीस आली.
          तालुक्यातील वाघे बाभूळगाव येथे आज्जीकडे राहत असलेल्या स्वप्नील युवराज जिरे या १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० स्वप्नील हा शौचास गेला होता. मात्र तो बराच वेळ परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता वाघेबाभूळगाव शिवारातील बरड माळ या शेतातील जांबाच्या झाडास नायलॉन दोरीने त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. स्वप्नील हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मात्र आत्महत्या नेमकी का केली ? हे स्पष्ट झाले नसून नांदूर घाट चे बिट अंमलदार मुकुंद ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version