मुंबई दि.26 – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नाही. नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असं एकनाथ खडसे म्हणाले.”
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशारा एकनाथ खडसेंनी दिला होता.ईडीने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलवल्याचं कळतंय. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.