केज दि.२६ – स्वतःच्या पत्नीचेच लज्जास्पद फोटो काढून पतीने तिच्या चुलत्याच्या वॉट्सअपवर पाठवले आणि स्वतः च्या मोबाईलवर ही स्टेटस ठेवल्या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून त्या पतीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक २२ वर्षीय महिला ही पतीसोबत वाद झाल्याने सध्या केज तालुक्यात माहेरी राहत आहे. तर मागील काळात पतीसोबत नांदत असताना या महिलेचे पतीने लज्जास्पद फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवले होते. तेच फोटो तिच्या पतीने दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी १.४९ वाजेच्या सुमारास तिच्या चुलत्याच्या वॉट्सअपवर पाठवले. त्यांनतर एवढ्यावरच न थांबता २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पतीने ते फोटो स्वतःच्या वॉट्सअपवर स्टेटस म्हणून ठेवले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध केज पोलिसात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करत आहेत.