Site icon सक्रिय न्यूज

कोरोना हा कांही शेवटचा आजार नाही – WHO

वर्षभरापासून जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक देश लस तयार करत आहेत. मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रायस यांनी इशारा देणारं वक्तव्य केलं आहे.

कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. मात्र कोरोना हा शेवटचा महासाथीचा आजार नसल्याचं टेड्रोस घेब्रायस यांनी म्हटलं आहे.कोरोना महासाथीच्या आजारापासून शिकण्याची ही वेळ आहे. दीर्घकाळापासून जगाने भय आणि उपेक्षांच्या चक्रात काम केलं आहे. आजार संपल्यानंतर आपण त्या संकटाला विसरतो आणि पुढील महासाथीचा आजार रोखण्यासाठी काहीच करत नाही, असंही घेब्रायस यांनी म्हटलं आहे.

             हवामान बदल रोखणे आणि पशू कल्याण केल्याशिवाय मानवी आरोग्य सेवा सुधारण्याचे प्रयत्न व्यर्थ असल्याचं घेब्रायस म्हणाले.
शेअर करा
Exit mobile version