सिंधुदुर्ग दि.29 – भाजप नेते नारायण राणे यांनी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे सरकार कोसळणार, असं वक्तव्य केलं आहे.
2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय हे सरकार कोसळल्यानंतर भाजपचं बहुमताचं भक्कम सरकार स्थापन होईल, असं राणे म्हणाले आहेत.येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार, असा दावा राणेंनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून नारायण राणे वारंवार हे सरकार पडणार, अशा प्रकारचं वक्तव्य करत आले आहेत.