Site icon सक्रिय न्यूज

मागच्या दहा वर्षांपासून तिघे भावंडं होती एका खोलीत बंदिस्त…….!

राजकोट दि.29 – गुजरातमधील राजकोटमध्ये एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. 3 भावा-बहिणींनी स्वतःला जवळपास 10 वर्ष एका बंद खोलीमध्यै बंदिस्त करून ठेवलं होतं. या तीन भावा बहिणींचं वय 30 ते 42 वर्षांच्या दरम्यान असून बेघरांसाठी काम करणाऱ्या साथी सेवा संस्थेच्या मदतीने या तिघांची सुटका करण्यात आली.                 

संस्थेचे अधिकारी जालपा पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार, “संघटनेच्या सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा खोलीत थोडाही प्रकाश नव्हता. खोली उघडताच शिळ्या अन्नाचा आणि मानवी विष्ठेचा दुर्गंध येत होता. अमरीश, भावेश आणि मेघना अशी या तिघांची नाव असून त्यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी खोलीमध्ये बंद करुन घेतलं होतं.” ते पुढे म्हणाले, “त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी खोलीत बंद करून घेतलं होतं. संस्थेच्या सदस्यांनी त्यांना बाहेर काढलं असून त्यांची योग्य पद्धतीने साफसफाई करण्यात आली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.”

             तिघांच्या वडिलांच्या सांगण्यानुसार, “मोठा मुलगा वकिली करायचा तर मुलगी मेघना हिने मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. याशिवाय लहान मुलाने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली असून आईच्या निधनामुळे त्यांना मानसिक धक्का बसला अन् त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं.”
शेअर करा
Exit mobile version