Site icon सक्रिय न्यूज

तरुणाच्या पोटातुन काढला टूथब्रश…….!

तरुणाच्या पोटातुन काढला टूथब्रश…….!

औरंगाबाद दि.30 – नाणे, गोट्या, खडे अजाणतेपणी पोटात गेल्याचे आपण ऐकल असेल. मात्र औरंगाबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने गिळलेली वस्तू ऐकून चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत.  औरंगाबादमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीने थेट टूथब्रश गिळल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित व्यक्तीला पोटदुखी सुरू झाली. त्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेतली असता डॉक्टरांनी सिटीस्कॅन करुन तरुणावर शस्त्रक्रिया केली. सर्जरीमध्ये 33 वर्षीय तरुणाच्या पोटातून टूथब्रश बाहेर काढण्यात आला. तरुणाने गिळलेला टूथब्रश हा तब्बल अर्धा फूट लांबीचा होता. इतक्या लांबीचा टूथब्रश तरुणाने का आणि कसा गिळला, हा प्रश्न डॉक्टरांनाही पडला आहे. सर्जरीनंतर या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

शेअर करा
Exit mobile version