मुंबई दि.३० – कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे सर्वच धास्तावले आहेत. भारतातही जवळपास 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातही या कोरोनाचा भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नव्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली आता 31 जानेवारी 2021 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कम्टेन्मेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील.