Site icon सक्रिय न्यूज

2021 साठी जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा.…….!

2021 साठी जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा.…….!

नवी दिल्ली दि.३१ – जगातील बहुतांश देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने चिंता वाढली आहे. संपूर्ण जग कोरोना संकटातून बाहेर पडण्याची वाट पाहात असताना जागतिक आरोग्य संघटनेनं गंभीर इशारा दिला आहे.

            2021 मध्ये कोरोनापेक्षा जास्त धोकादायक महामारी येऊ शकते. त्या संकटाचा सामना करण्याची तयारी जगानं करायला हवी. त्यासाठी गांभीर्यानं पावलं उचलायला हवीत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

कोरोनाचा विषाणू जगभरात वेगानं पसरला. जगाच्या कानाकोपऱ्यात याचा परिणाम पाहायला मिळाला. मात्र ही महामारी सर्वात मोठी महामारी असेलच असं नाही, असं मायकल रेयान म्हणाले. कोरोना विषाणूचं वेगानं संक्रमण झालं. त्याच्या फैलावाचा वेग जास्त आहे. या विषाणूमुळे लाखो लोकांचा जीव गेला. मात्र अन्य रोगांचा विचार केल्यास कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे, असं रेयान यांनी सांगितलं.

शेअर करा
Exit mobile version