मुंबई दि.1 – येत्या काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलं.आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
राजेश टोपेंनी राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्यानंतर संबंधितांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. यावेळी सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचं आवाहन केलं.