Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे युवकाची आत्महत्या 

केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे युवकाची आत्महत्या 
केज दि.२ – एका १९ वर्षीय युवकाने रागाच्या भरात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे घडली. आप्पासाहेब उर्फ बालाजी सुंदर चौरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
        तुकुचीवाडी येथील सुंदर काशीनाथ चौरे हे ऊसतोड मजुर असून ते साखर कारखान्यावरून कोर्टची तारीख असल्याने गावी आले होते. ते १ जानेवारी रोजी सकाळी केजच्या कोर्टात तारखेला आले होते. तर पाठीमागे त्यांचा मुलगा आप्पासाहेब उर्फ बालाजी सुंदर चौरे ( वय १९ ) याने घरातून रागाच्या भरात जाऊन शिवारातील माणिक चौरे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. तो इयत्ता १२ वी झाल्यानंतर पदवीचे शिक्षण घेत होता. या घटनेची माहिती मिळताच विडा बिटचे जमादार बाळकृष्ण मुंडे, पोलीस नाईक बाळू सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुंदर काशीनाथ चौरे यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version