Site icon सक्रिय न्यूज

नामांतर प्रश्नावर खा. रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य……..!

नामांतर प्रश्नावर खा. रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य……..!

मुंबई दि.३ – औरंगाबादच्या नामांतराचा वाद चांगलाच पेटत चालला आहे. काँग्रेसचा नामंतराला विरोध असल्याने शिवसेना मोठ्या पेचात पडली आहे. मात्र अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.औरंगाबादच्या नामांतरावरून वाद होऊन महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं भाकीत रामदास आठवलेंनी केलं आहे. पालघरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतर करायचं होतं तर त्यांनी युतीत असताना का केलं नाही?, असा सवाल आठवलेंनी केला आहे. त्यासोबतच ठाकरे सरकार पडणार असून राज्यात भाजप-आरपीआयचं सरकार येणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

शेअर करा
Exit mobile version