Site icon सक्रिय न्यूज

सॅनिटायझरच्या बाटलीच्या स्फोटात महिलेचा मृत्यू……! खबरदारी घेण्याची गरज…..!

कोल्हापूर दि.४ – सध्याच्या काळात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझरच्या बाटलीच्या स्फोटात महिलेचा मृत्यू झाला आहे. मागच्या आठ दिवसांपूर्वी सदरील महिला गंभीर जखमी झाली होती. मात्र, आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असून कागल तालुक्यातील बोरवडे भागातील ही घटना घडली आहे.
           मागच्या आठ दिवसांपूर्वी सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत असताना त्यामध्ये एक सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. बाटलीत शिल्लक असलेल्या सॅनिटायझरमुळं आग लागली होती. त्यांच्या गाऊन ने पेट घेतला त्यात त्या ८० टक्के भाजल्या होत्या. त्यांना तातडीने सीपीआर येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र आठ दिवसांच्या उपचारांनंतर आज त्यांचा मृत्यू झाला.
        दरम्यान मागच्या कांही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात चुली पेटवण्यासाठी सॅनिटायजर चा वापर होत असल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र असे प्रकार जीवावर बेतू शकतात त्यामुळे सॅनिटायजर चा वापर करताना खबरदारी घेण्याची गरज आहे.
शेअर करा
Exit mobile version