अंबाजोगाई दि.४ – आज अनेक क्षेत्रामध्ये महिला या चांगल्या तसेच उच्चपदस्थ स्थानावर विराजमान आहेत हे केवळ सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षामुळेचं असून त्यांनी त्याकाळात स्त्रीयांना शिक्षणासाठी प्रभावित केले. सर्व महिलांना याचा आज फायदा झालेला दिसतो आहे असे गौरव्दगार केज मतदार संघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी सेंट अँन्थोनी शाळेतील आयोजित सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त काढले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून जि.प अध्यक्ष शिवकन्या सिरसाट ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्याध्यापिका प्रतिभा देशमुख, नगरसेविका सविता लोमटे, नगरसेविका जयश्री साठे, डॉ.सुनिता बिराजदार, अंजली चरखा (इन्नरव्हिलग्रुप), नगरसेविका वासंती बाबजे सेवानिवृत्त प्रा. जयश्री आरसुडे, योगशिक्षिका सुगंधा सोमवंशी, डॉ. ज्योती धपाटे, नगरसेविका उज्वला पाथरकर, नगरसेविका शिल्पा गंभीरे, योग शिक्षिका मनिषा इंगळे, नगरसेवक सारंग पुजारी, डॉ. बालासाहेब लोमटे, डॉ.सुरेश आरसुडे, बालासाहेब पाथरकर, फादर गुलाब, मेजर प्रा. शांतीनाथ बनसोडे श्री. शेंगुळे, संतोष चोपणे, चंद्रकांत हजारे, भाऊराव गवळी, महादेव पुजारी, पत्रकार राम जोशी, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार पुष्प अर्पण करण्यात येऊन जिजाऊ वंदना आणि सावित्रीमाई फुले यांचे गीत सादर करण्यात आले. यानंतर डॉ.अरुणा केंद्रे (दहिफळे) वैद्यकीय अधिक्षक स्त्री रुग्णालय लों.सावरगाव, सुरेखा खंडाळे मुख्याध्यापिका सो. वि.कन्या शाळा घाटनांदूर, सिस्टर फातिमा सुपरवायझर, सेंट अँन्थनी स्कूल, सुरेखा म्हेत्रे अधिपरिचारिका, उपरुग्णालाय केज, प्रियंका काळे स्टाफ नर्स स्वा.रा.ती अंबाजोगाई, अर्चना रोडगे एम.बी.बी.एस.जे.जे. हॉस्पिटल मुंबई, सविता कराड या सर्व सावित्रींच्या लेकींचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.यशवंत आरसुडे व योगासनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगळे यांनी केले.सध्या कोरोणाची परीस्थिती असल्यामुळे सर्व कार्यक्रमातील प्रेक्षकांना नेहरू युवा मंडळ कळंब व ग्राम ऊर्जा फाउंडेशनअंबाजोगाई यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दोनशे मास्क वाटप करण्यात आले.याप्रसंगी
मंडळाचेअध्यक्ष ज्योतीराम सोनके व संचालिका स्वाती आरसुडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले समितीचे संचालक अनंत आरसुडे, संतोष जिरे, बळीराम चोपणे, यशवंत आरसुडे, उज्जैन बनसोडे, योगगुरू परमेश्वर भिसे, पवन जिरे, ऍड.संतोष पवार, प्रदीप चोपणे, संजय आरसुडे, भाऊराव गवळी, नागोराव पवार, राहुल माळी, महादेव आरसुडे, धनंजय शिंदे,अशोक आरसुडे,अमोल साखरे,अविनाश उगले,गोरेसर,आडे सर, नितीन जिरे, गजानन घोडके, पंकज राऊत व इतर सर्वांनी परीश्रम घेतले.याप्रसंगी शहर व परिसरातील सर्व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केले तर आभार बळीराम चोपणे यांनी मानले.