मुंबई दि.५ – नियम सर्वांना सारखेच असतात याचे भान कित्येकांना राहिलेले नाही.ब्रिटन हुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जात आहे. तसेच या प्रवाशांना 14 दिवसांसाठी हॉटेल्स आणि इतर ठिकाणी क्वारंटाईन होणं सक्तीचं आहे. मात्र अनेकजण हे नियम धाब्यावर बसवत असल्याचं समोर आलं असूूून स्वतःला मोठे सेलेब्रिटी समजल्या जाणाऱ्या दोघांना मुंबई महापालिकेने मोठा दणका दिला आहे.
अभिनेते सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तिघांनीही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं असून, त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. हे तिघे 25 डिसेंबरला यूएईवरून मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून थेट घर गाठल्यानं त्यांच्या विरोधात पालिकेनं तक्रार नोंदवली होती. अखेर त्या तक्रारीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
25 डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी ताज लँडमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यांनी 26 तारखेला या रुम रद्द करून त्यांनी घर गाठलं, त्यामुळे पालिकेने साथ नियंत्रण प्रतिबंधक कायद्यात अंतर्गत पोलिसात तक्रार केली होती. सदरील तक्रारीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.