पुणे दि.५ – सध्याचा काळ अडचणीचा आहे. अडचणीच्या काळात गरजू होतकरू आणि आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांना मदत केली पाहिजे ही मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांची शिकवण आहे. मा. खेडेकर साहेबांनी सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून हजारो-लाखो माणसं जोडली आणि ती उभी केली. आपल्या मुलांनी पडेल तो व्यवसाय केला पाहिजे आणि शिक्षणापासून प्रत्येक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले पाहिजे. हाच संभाजी ब्रिगेडचा विचार आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज कु. आकांक्षा पासलकर या विद्यार्थिनीला शैक्षणिक शिष्यवृत्तीचा धनादेश संभाजी ब्रिगेडचे नेते मा. विकास पासलकर यांच्या हस्ते देण्यात आला. समाजातील ज्या वर्गाची पोट भरली आहे, त्या वर्गाने समाजातील गरजू वर्गाला मदतीचा हात दिला पाहिजे अशी भूमिका मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जाहीर कार्यक्रमात वेळोवेळी तसेच आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वेळोवेळी सांगितले आहे.
आज मा. खेडेकर साहेबांचा वाढदिवस साजरा करतांना गरजू विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती योजनेचा धनादेश देऊन साहेबांचा विचार कृतीतून उतरवून आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत आहोत. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत असे मत मा. विकास पासलकर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मिहिनी रणदिवे, जिल्हा सचिव निलेश ढगे, तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड, बी आर गायकवाड, उपस्थित होते.