Site icon सक्रिय न्यूज

पोलला बांधून विषारी औषध पाजले, केज तालुक्यातील घटना…..!

पोलला बांधून विषारी औषध पाजले, केज तालुक्यातील घटना…..!
केज दि.६- तालुक्यातील युसुफवडगांव शिवारात एक शेतकरी पाईप जमवण्याचे काम करत असताना शेतकऱ्याला लाकडी काठीने व चप्पलाने मारहाण करुन विद्युत पोलला बांधून विषारी पाजल्याची घटना घडली. या प्रकरणी विलास मारुती पानढवळे यांच्या फिर्यादीवरून युसुफवडगांव ठाण्यात १३ जणाबिरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
        युसुफवडगांव येथील विलास पानढवळे हे दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वे नं ७१ मध्ये त्यांचा शेतात पाईप एकत्र जमा करण्याचे काम करत होते. यावेळी आरोपीने गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून यातील पानढवळे यांना काठीने, चप्पलबुटासह दगडाने मारहाण करत दोन्ही पाय धरून रस्त्याने ओढत नेले. तसेच दोरीने विद्युत पोलला बांधले व डोळ्यावर पट्टी बांधून जिवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजले.
            या प्रकरणी विलास पानढवळे यांच्या फिर्यादीवरून दि.५ जानेवारी रोजी युसुफवडगांव ठाण्यात गु.र.नं.३/२०२१ कलम ३०७,१४३,१४७, १४८,१४९ भादवी नुसार आरोपी बालासाहेब मारुती पानढवळे,वैभव पानढवळे, विकास पानढवळे, बालासाहेब दत्तुबा,निवृत्ती शिंपले, बाबा दतु शिंपले,आश्रुबा दत्तुबा शिंपले, महादेव धोंडीबा शिंपले, अनुसया बालासाहेब पानढवळे,गिता वैभव पानढवळे, स्वाती विकास पानढवळे व अन्य एकुण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास युसुफवडगांव ठाण्याचे उपनिरीक्षक कोळी हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version