केज दि.८ – मागच्या कांही दिवसांपासून केज तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची घट झाली होती त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान दिसत होते. मात्र आज आलेल्या अहवालात 6 रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.
शहरातील धारूर रोड वरील भवानी नगर भागात तीन तर ग्रामीण भागातील वरपगाव, चिंचोली माळी तसेच कासारी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः ची तपासणी करून घ्यावी व निष्काळजीपणा न करता कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.