Site icon सक्रिय न्यूज

एक हेक्टर क्षेत्रातील ऊस जळून खाक, केज तालुक्यातील घटना…..!.

केज दि.९ –  तालुक्यातील युसूफवडगांव येथील शेतकरी दगडु दादाराव गायके यांंचे कुटूंबीय मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला बाहेर गावी गेले असता त्यांचा एक हेक्टर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घटना दि.८ जानेवारी रोजी दुपारी घडली.
      याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.८ जानेवारी रोजी गायके यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडयाचा अंबाजोगाई येथे नियोजित कार्यक्रम असल्याने सर्व कुटुंबातील सदस्य कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा एक हेक्टर क्षेत्रावर असणारा ऊस दुपारी १२ च्या सुमारास जळल्याची घटना घडली. यामध्ये ऊस व ठिबक जळून २ ते ३ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर शेजारील शेतकरी साहेबराव गायके यांच्याही शेतातील ठिबक जळुन त्यांचे सुद्धा अंदाजे १ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
        दरम्यान सदरील ऊस नेमका कोणत्या कारणाने जळाला हे स्पष्ट झाले नसून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
शेअर करा
Exit mobile version