Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग……!

केज तालुक्यात १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग……!
 केज दि.१० – म्हशीला पाणी पाजून येत असलेल्या १३ वर्षाच्या मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केल्याची घटना युसुफवडगाव ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी शिवलिंग शिवाजी पिसुरे ( रा. जानेगाव ता. केज ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील १३ वर्षाची मुलगी ही आठ जानेवारी रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान म्हशीला पाणी पाजण्यासाठी जात होती. ती एकटीच असल्याची संधी साधून आरोपी शिवलिंग शिवाजी पिसुरे ( रा. जानेगाव ता. केज ) याने तिचा हात धरला व तिला कसेतरी वाटल्याने सोडला. मात्र पुन्हा ती म्हशीला पाणी पाजून परत येत असताना शिवलिंग पिसुरे याने तिचा हात धरून उसाच्या शेतात नेऊन बळजबरी करीत विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने प्रसंगावधान ओळखून त्याच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला. मात्र त्याने तिला जाताना कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी घडलेला प्रकार आईवडीलांना सांगितल्यावर त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिवलिंग पिसुरे याच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे हे पुढील तपास करत आहेत.
भोपला येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 
        एका २३ वर्षीय तरुणाने पाण्याच्या टाकीच्या लोखंडी शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील भोपला येथे घडली. शिवकुमार गौतम जानराव असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
     भोपला येथील जानराव वस्तीवरील शिवकुमार गौतम जानराव ( वय २३ ) या तरुणाने नऊ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या पूर्वी वस्तीजवळील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी शिडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच चिंचोलीमाळीचे बिट जमादार अमोल गायकवाड, पोलीस नाईक अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मयताचा भाऊ उत्तम गौतम जानराव यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version