केज दि.११ – शहरातील जीवन विकास शिक्षण मंडळ संचालित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेतील १४ विद्यार्थ्यांची एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे. या मेडिकलला लागलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अंकुशइंगळे हेतर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब अस्वले हे उपस्थित होते. रेश्मा संतोष देशमुख, रिचा बालासाहेब देशमुख, भगवती पंडित सावंत, पूनम लक्ष्मण डोईफोडे, अक्षदा चंद्रकांत लामतुरे, साक्षी शंकर शिंदे, कोमल सतीश जाधव, आरती अरुण डोईफोडे, राजश्री भाऊराव मुंडे, स्नेहा जालिंदर चंदनशिव, ऋतुजा अशोक केदार, संकेत गंगाधर काळे, रविकांत रामदास वडणे, प्रद्युम्न रमेश तपसे या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह शाल, श्रीफळ व संस्थेचे मानचिन्ह देऊन सत्कार सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. बालासाहेब अस्वले यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणातून समाज परिवर्तनासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, सचिव प्रकाश कोकीळ, सहसचिव जी. बी. गदळे, विलास जोशी, गणेश कोकीळ, शाळेचे मुख्याध्यापक बी. व्ही. गोपाळघरे, मुख्याध्यापक वसंत शितोळे प्रा. शंकर भैरट, भालचंद्र देव यांच्यासह शिक्षकवृंद व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन हनुमंत घाडगे यांनी केले.