बीड दि.११ – आज प्राप्त झालेल्या 421 कोरोना तपासणी अहवालात जिल्ह्यात एकूण 35 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये केज तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
अहवालात अंबाजोगाई 6, बीड 9, आष्टी 12, गेवराई 2 तर माजलगाव, परळी, शिरूर आणि वडवणी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत. तर केज शहरातील गणेश नगर भागातील 32 वर्षीय पुरुष तर शिंदी येथील 48 वर्षीय पुरुष असे दोन रुग्ण आढळून आले आहेत.