पुणे दि.१२ – बहुप्रतिक्षित कोरोनाच्या प्रतिकारासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेल्या ‘कोविडशल्ड’ लसीच्या पहिल्या बॅच चे ट्रक रवाना झाले आहेत. आज सकाळी पहाटे 4. 50 च्या सुमरास हे ट्रक रवाना झाले. पोलिसांच्या सुरक्षेत हे ट्रक पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचवण्यात आले. तिथून कार्गो विमानांद्वारे ही लस देशभरात पाठवली जाणार आहे. यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.
पोलिसांनी आधी लस घेऊन जाणाऱ्या गाडीची पुजा केली. केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.
दरम्यान, या लसीचा वापर हा पहिल्या टप्यात कोरोमा योद्ध्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यातील 65 लाख डोस इतर राज्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.