Site icon सक्रिय न्यूज

केज तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर घुले व शेप यांची निवड

केज तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर घुले व शेप यांची निवड
केज दि.१३ – बीड जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या केज तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीवर परिमाला विष्णू घुले यांची सदस्य पदी तर सुमेधा प्रविणकुमार शेप यांची अशासकीय महिला सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागाचा सर्वागीण आणि व्यापक विकास घडून यावा या हेतूने आणि विशेषत: समाजातील अविकसित स्तराच्या विकासावर भर देण्याच्या दृष्टीने शासनाने सामाजिक व आर्थिक विकासाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. या कार्यक्रमाचे यश हे सर्वस्वी ते कशा पध्दतीने कार्यान्वीत केले जातात आणि या कार्यक्रमाशी संलग्ल असलेले स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक पुढाकार यांचेवर अवलबून असते हे लक्षात घेवून शासनाने तालुका पातळीवर संदर्भिय निर्णयानुसार एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन करणेचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार केज तालुका स्तरीय समन्वय व पुनर्विलोकन खालील प्रमाणे गठीत करण्यात येत आहे. या समितीवर सुमेधा शेप व परिमाला घुले यांची निवड करण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version