Site icon सक्रिय न्यूज

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ…….! सहा महिन्यांची रक्कम रोख मिळणार……!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ…….! सहा महिन्यांची रक्कम रोख मिळणार……!

मुंबई दि.१४ – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीला गोड बातमी दिली आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता महागाई भत्ता 9 टक्यांवरून 12 टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या कालावधीसाठी वाढीव 3 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

दरम्यान जानेवारी 2019 ते जून 2019 या सहा महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जानेवारी 2021 च्या पगारात रोखीने मिळणार आहे.

शेअर करा
Exit mobile version